

आमचे व्हिजन
“लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि सहकारातून सर्वांचे आनंदी विश्व साकारण्यासाठी सेवा देणे. विश्वासार्हता, गुणवत्ता आणि अतयाधुनिकता या त्रिसूत्रींनद्वारा देशभरात नवे मानदंड रचणे.”
हातही मिळतील…
मनेही जुळतील…
प्रिय सुहृद, सप्रेम नमस्कार…
आपल्या सर्वांच्या सहकार्याने विश्वविनायक परिवार यशाची वाटचाल करत आहे.
शुद्ध विश्वासाची आणि सचोटीची परंपरा आता अधिक जोमाने सहकार क्षेत्रात देखील कार्य करत आहे. लोकांच्या आर्थिक समस्या सोडवणे, उत्तमोत्तम आणि सुलभ आर्थिक योजना देणे, आपला विश्वास जपणं, आपल्या विविध कार्यासाठी मदतीला धावून येणं हेच आमच मुख्य ध्येय आहे.
आपण मेहनतीनं कमावलेला एकेक रुपया आम्ही अखंड जपू. तो वाढवू आणि आपणांस आणि आपल्या परिवारास सुंदर भविष्य देण्याचा सातत्याने विचार करू. विश्वविनायक परिवारात आपले मनापासून स्वागत आहे.
संस्थापक, चेअरमन
मा. श्री. मोदक प्रभाकर शहाणे